जाणून घ्या पीएफ व्याजदर कपातीचा परिणाम काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020
Total Views |
EPFO_1  H x W:
 


तुमच्या पीएफच्या रक्कमेवर आता मिळणार ८.५० टक्के व्याज

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतर्फे (EPFO) चालू आर्थिक वर्ष (२०१९-२०) साठी जमा रकमेवर १५ अंकांची कपात केली आहे. या वर्षासाठी व्याजदर ८.५० टक्के राहणार आहे. पूर्वी हा व्याजदर ८.६५ टक्के इतका होता. नोकरदार वर्गावर याचा थेट परिणाम जाणवणार आहे. त्यांच्या पगारातून जमा होणाऱ्या रक्कमेवर पडणार आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत (सीबीटी) हा निर्णय घेण्यात आला आहे.


सध्या जगभरातील अर्थव्यवस्थांवर असलेली आर्थिक सुस्ती आणि गुंतवणूकीतून मिळणाऱ्या परतावा आदी प्रमुख कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. ईपीएफओची एकूण गुंतवणूक ही १८ लाख कोटी रुपये इतकी आहे. 'डीएचएफएल' आणि 'आयएल एण्ड एफएस' या दोन्ही कंपन्यांमध्ये ईपीएफओची साडेचार हजार कोटी इतकी गुंतवणूक आहे. ईपीएफओ आपल्या एकूण गुंतवणूकीपैकी ८५ टक्के रक्कम कर्जस्वरूपातील रोख्यांमध्ये तर उर्वरित १५ टक्के रक्कम ही भांडवली बाजारात केली जाते.


आज झालेल्या या निर्णयाचा फटका एकूण सहा कोटी नोकरदारांना बसणार आहे. दरम्यान या व्याजदर कपातीच्या निर्णयावर केंद्रीय श्रमिक मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाची संमती घेणे आवश्यक आहे. यावेळी किमान नोकरदारांना दिलासा मिळेल का याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
@@AUTHORINFO_V1@@