पंतप्रधान मोदींचा बेल्जीयम दौरा रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020
Total Views |

narendra modi_1 &nbs




नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी बेल्जियमला भारत - ​​युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेसाठी जाणार नाहीत ,परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी माहिती दिली. हेल्थ प्रोटोकॉल आणि एकमेकांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मैत्रीपूर्ण वातावरणात हा निर्णय घेण्यात आला की ही बैठक नंतर परस्पर सोयीनुसार आयोजित केली जाईल. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ व १८ मार्च रोजी बांग्लाहू जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी बांगलादेशला भेट देण्यासाठी देतील.




भारत सरकारने इटली आणि कोरियाहून आलेल्या लोकांना सल्लागार जारी केले आहेत. अशा सर्व लोकांना भारतात येण्यापूर्वी कोरोना तपासणी करणे अनिवार्य आहे. इटली आणि कोरियाहून आलेल्या लोकांना लॅबमधून कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. भारत सरकारची ही सूचना येत्या १० मार्चपासून लागू होणार आहे. भारतात कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०वर पोचली आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका रुग्णाचे तपासणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, हा रुग्ण मध्यमवयीन असून नुकताच इराणला जाऊन आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@