दाभोलकर हत्या प्रकरण : ठाणे खाडीत सापडले हत्या केलेले पिस्तूल ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020
Total Views |

narendra dabholkar_1 
 
 
ठाणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) हाती मोठा पुरावा लागला असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. नॉर्वेच्या समुद्री एक्सपर्ट आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ठाण्याजवळच्या खारेगाव क्रीकमध्ये एक पिस्तूल सापडले. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. पुण्यामध्ये २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती.
 
 
 
 
सापडलेले पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का, याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने २०१९ रोजी पुणे न्यायालयात ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचे सांगितले होते. “अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडले आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@