यंदा देशभर कोरोनाच्या भीतीने होळीदिवशी असणार शुकशुकाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020
Total Views |

holi celebration_1 &
मुंबई : ९ तारखेला होळीचा सण पण या सणवार कोरोनाचे काळे ढग निर्माण झाले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी अनेकजण होळीनिमित्त एकत्र येऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. तसेच, हिंदी, मराठी सृष्टीतील सर्व कलाकार एकत्र येऊन होळी साजरी करतात. परंतु, यावेळी मात्र अनेकांनी सार्वजनिक होळीची कार्यक्रम रद्द केले आहेत. कारण, जगभरासह देशांमध्येही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.
 
 
मराठी सिने कलाकारांचे दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारे होळीचे सेलिब्रेशन यंदा रद्द करण्यात आले आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसची लागण झालेले २८ रुग्ण आढळल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. या व्हायरस हवेतून किंवा लगण झालेल्या माणसांच्या संपर्कातून पसरत असल्याने यंदा एकत्र येऊन होळी खेळण्याचे कार्यक्रम सर्व ठिकाणी रद्द करण्यात आले आहेत.
 
 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील यावर्षी होळी खेळणार नसल्याचे ट्विट केले होते. त्यापाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील यावर्षी होळी खेळणार नसल्याचे सांगितले. यात आता मराठी सिने कलाकारांचीही भर पडली आहे. त्यामुळे मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये धामधुमीत खेळला जाणारा रंगांचा उत्सव यंदा खेळला जाणार नाही.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@