वालीद जो है अब्बा हमारे वो ड्रग्ज तस्कर थे और अम्मी भी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2020
Total Views |
Shahrukh_1  H x




शाहरुखच्या तपासणीत खळबळजनक खुलासे उघड


नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारादरम्यान पोलीसांवर पिस्तुल रोखणारा मोहम्मद शाहरुख याला अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलीसांनी शाहरुखला अटक केली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. उत्तर प्रदेशातील वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार शाहरुखच्या चौकशीत अनेक खुलासे उघड झाले आहेत. त्याच्या परिवारातील सदस्यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघडकीस आले आहे. शाहरुखवर यापूर्वी कुठलाही गुन्हा नोंद झाला नव्हता मात्र, त्याने दिल्ली हिंसाचारावेळी केलेल्या कृत्यांमुळे त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.


दिल्लीतील जाफराबाद हिंसाचारातील चेहरा असलेल्या शाहरुखला अखेर मंगळवारी अटक करण्यात आली. पोलीसांवर गोळ्या रोखण्याशिवाय त्याने आठ गोळ्याही झाडल्या आहेत. त्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झाले होते. त्यानंतर आपल्या परिवारासोबत तो फरार होता. त्याचे वडिल ड्रग्ज तस्करी करण्याच्या गुन्ह्यात तुरुंगवारीही करून आले आहेत. तसेच त्याच्या आई आणि काकाही या गुन्ह्यात सामिल होते. शाहरुख ननिहाल मीरगंजच्या खानपुरा मोहल्ला येथे राहतो. या भागात कित्येक ड्रग्ज तस्कर राहतात.

 
दंगलीच्या रात्री त्याने काय केले ?

 
२४ फेब्रुवारीची रात्र शाहरुखने कनॉट प्लेसच्या कार पार्कींगमध्ये काढली. त्यानंतर कपडे बदलून तो शहरात फिरू लागला. त्याने अनेक मित्रांना आश्रय देण्यासाठी फोन केले. तो जालंधरमध्ये एका मित्राकडे राहण्यासाठी गेला. त्यानंतर तो बरेलीला गेला. काही दिवस तेथे तो ड्रग्ज तस्करांजवळ लपून बसला. यानंतर त्याने शामली कैरेना येथे जाण्यासाठी बस स्थानक गाठले. याच दरम्यान त्याला पोलीसांनी गाठले.
 

कसून चौकशी होणार


 
पोलीस आता शाहरुखची चौकशी करत आहेत. अद्याप त्याची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळलेली नाही. मात्र, त्याच्याकडे दंगलीवेळी वापरण्यात आलेली पिस्तुल आढळली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, तो शौक म्हणून पिस्तुल सोबत बाळगायचा. त्यांची मोजे बनवण्याची फॅक्टरी होती. फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका मजूराकडून त्याने दोन वर्षांपूर्वी बिहारच्या मुंगेर येथून पिस्तुल मागवली होती. घरातून तो आठ काडतूसे घेऊन निघाला होता. त्यातील तीन गोळ्या त्याने घातल्या. दोन काडतुसे त्याच्याकडून हरवली आणि तीन त्याच्याकडे आढळली.
 

टिकटॉकवर व्हीडिओ बनवणे आणि मॉडेलींगची आवड

 
शाहरुख बीए दुसऱ्या वर्षापर्यंत शिकला आहे. त्याला मॉडेलिंग करायची इच्छा आहे शिवाय तो टिकटॉकरही आहे. यापूर्वी त्याने एक म्युझिक व्हीडिओही तयार केला आहे मात्र, तो प्रदर्शित झाला नाही. पोलीस आता शाहरुखने दिलेल्या माहितीची पडताळणी करत आहेत. तसेच त्याचे कॉल रेकॉर्डही तपासले जात असून मोबाईल लोकेशन आदी तपासणी केली जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@