आभासी चलनावरील बंदी उठवा : सर्वोच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2020
Total Views |
BitCoin _1  H x


बिटकॉईन व्यवहार करण्यासाठी मंजूरी ?

नवी दिल्ली : बिटकॉईनसारख्या आभासी चलनांवरील बंदी उठवावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी देताना या चलनावरील बंदी उठवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपले मत मांडले आहे. आभासी चलनाद्वारे व्यवहार करण्यास परवानगी देण्यात येईल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
 
 
एप्रिल २०१८ मध्ये रिझर्व्ह बॅंकेने एका पत्रकाद्वारे बिटकॉईन आणि जगातील इतर चलनांतील व्यवहारांवर बंदी आणली आहे. बिटकॉईन आणि इतर आभासी चलनाद्वारे ऑनलाईन व्यवहार किंवा ट्रेडींग केली जाते. मनी लॉंडरिंग आणि इतर प्रकरणांमध्ये वापर होण्याच्या भीतीने या चलनावर भारतात निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने आता या चलनावरील निर्बंध उठवण्याचे निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या या पत्रकाला एका औद्योगिक समुहाच्या इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यापूर्वी फेसबूकनेही आपले आभासी चलन व्यवहारात आणले होते. मात्र, या चलनाला भारतात मंजूरी मिळू शकलेली नव्हती. बिटकॉईनमध्ये होणाऱ्या उतार-चढावांद्वारे यात गुंतवणूक करून मुल्य वाढल्यानंतर विक्री करून नफा मिळवण्याची पद्धत गुंतवणूकदार अवलंबतात.
 
 
 
याचा फटका महानायक अमिताभ बच्चन यांनाही बसला होता. त्यांनी केलेल्या गुंतवणूकीवर त्यांना ६४० कोटींचा नफा झाला होता. मात्र, काही दिवसांतच मुल्य घसरल्यामुळे त्यांना हा लाभ मिळू शकला नव्हता. २० जून २०१४ रोजी अमिताभ यांनी नऊ कोटींची गुंतवणूक केली होती. कालांतराने ही रक्कम ४.७ कोटी इतकीच राहीली.
 

 
 
 


@@AUTHORINFO_V1@@