दिल्लीत 'जमात'च्या कार्यक्रमात कोण गेले त्यांचा शोध घ्या !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |
Rajesh Tope on Tablig-e-j





मुंबई
: दिल्लीतील 'तब्लीग-ए-जमात' या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहुतांश व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर आता केंद्र आणि देशांतील राज्य सरकारे सतर्क झाली आहेत. या कार्यक्रमात सामील झालेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्रातून कोण-कोण सहभागी झाले होते, त्यांचा शोध घेण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यातून शंभरहून अनेकजण इथे सहभागी झाल्याची प्रार्थमिक माहिती आहे.
 
 
दिल्लीतील या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी २४ जणांना करोनाची लागण झाल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे, असे दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी दिली. हजारांहून अधिक जणांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात महाराष्ट्रातील शेकडो नागरिक सहभागी झाल्याची माहिती समजते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आढळली तर, त्यांना लगेच क्वारंटाइन करण्यात येईल. तसंच त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले आहे.
 
 
राजेश टोपे म्हणाले, "राज्यातून जवळपास शंभरजण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमात नेमके किती जण सहभागी झाले होते, त्याचा शोध घेण्याच्या सूचना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्या आहेत. ही खूपच गंभीर बाब आहे. नवी दिल्लीत सोमवारी २५ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील १८ जण निजामुद्दीन येथीलच आहेत. त्यामुळे आता युद्धपातळीवर या सर्वांचा शोध घेणे आवश्यक आहे.
@@AUTHORINFO_V1@@