साताऱ्यात बिबट्या 'लाॅकडाऊन'; वाचा काय घडले पुढे..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |
leopard_1  H x
 

बचावासाठी जमलेल्यांच्या हातावर तुरी देऊन बिबट्या पसार

 
 
मुंबई (प्रतिनिधी) - साताऱ्यातील पालटण तालुक्यातील एका घरात सोमवारी रात्री मादी बिबट्या 'लाॅकडाऊन' झाली होती. वन विभाग आणि वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यांनी नऊ तास या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, बचावासाठी जमलेल्या सर्वांच्या हातावर तुरी देऊन बिबट्या जंगलात पसार झाला. नऊ तासांमध्ये पाचवेळा बेशुद्धीचे इंजेक्शन देऊनही बिबट्या जेरबंद न झाल्याने हे वन विभागाच्या बचाव पथकाचे अपयश मानले जात आहे. आता पिंजरा लावून या मादी बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत.
 
 
leopard_1  H x
 
 
 
 
 
महाराष्ट्रातील सर्व नागरिक कोरोनामुळे घरांमध्ये लाॅकडाऊन झालेले असताना काल सातारा जिल्ह्यात एका घरात बिबट्या लाॅकडाऊन झाला. पाटण तालु्क्यातील मारुल हवेली गावचे सरपंच नितीन शिंदे यांच्या रानातील घरामध्ये एक मादी बिबट्या अडकली होती. सायकांळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कोबंडया खाण्यासाठी घरात शिरलेल्या बिबट्याला वेळीच लोकांनी पाहिले. प्रसंगावधान राखून त्यांनी घराचे दार बंद घेतले. रात्री ९ वाजता या घटनेची माहिती सातारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रोहन भाटे यांना मिळताच ते वन विभागाच्या पथकासह त्याठिकाणी रवाना झाले. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या बचावकार्यास सुरुवात झाली.
 
 
 
 
बिबट्या घराच्या पोटमाळ्यावर जाऊन बसला होता. त्यामुळे पिंजरा लावून बिबट्या अडकण्याची वाट पाहण्यात आली. सरतेशेेवटी उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंग हाडा, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास काळे आणि भाटे यांच्यात चर्चा करुन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधून बेशुद्ध करण्याचे साहित्य मागविण्यात आले. कोल्हापूर वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. वाळवेकर आणि बचाव पथक रात्री २ वाजता घटनास्थळी पोहोचले. पाच वेळा बेशुद्दचा डार्ट मारूनही बिबट्या बेशुद्ध पडला नाही. त्यामुळे पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घरावरची कौल काढून जाळी लावून बिबट्याला पकडण्याचा प्रय़त्न झाला. परंतु, या प्रयत्नात बिबट्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडून जंगलात पसार झाल्याची माहिती रोहन भाटे यांनी दिली. आता मारुल हवेली भागात पिंजरे लावून पुन्हा बिबट्या पकडण्यास प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये पाच वेळा बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात. यामध्ये एकदा बिबट्याने स्वत:च इंजेक्शन काढून फेकून दिले. महत्त्वाचे म्हणजे वन विभागाच्या डोळ्यादेखत बिबट्या जंगलात पसार झाला. त्यामुळे  वन विभागाच्या बचाव पथकाचे हे अपयश मानले जात आहे.  
@@AUTHORINFO_V1@@