धक्कादायक ! दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकचा आणखी एक डॉक्टर कोरोना बाधित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |


moholla clinic_1 &nb



नवी दिल्ली : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. हा डॉक्टर ईशान्य दिल्लीतील बाबरपूर भागातील असल्याचे कळते. डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाकडून या नोटीस बजावण्यात आली आहे की, १२ मार्च ते २० मार्च या कालावधीत या मोहल्ला क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या कोणत्याही रूग्ण किंवा घरातील लोकांना पुढील १५ दिवस त्यांच्या घरात स्वतःला वेगळे ठेवणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबरपूर भागातील मोहल्ला क्लिनिकच्या डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली, त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. आज डॉक्टरांच्या चाचणीचा अहवाल आला, ज्यामध्ये हा संशियत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यानंतर डॉक्टरांसह त्यांचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयाना वेगळे ठेवण्यात आले आहेत.

 

तत्पूर्वी, मोहल्ला क्लिनिकमधील एक डॉक्टर पूर्वोत्तर दिल्लीतील मोजपूर भागात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांत मोहल्ला क्लिनिकला किमान ९०० लोक येऊन गेले असण्याची शंका उपस्थित होत आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन म्हणाले, "कोरोना विषाणूची लागण झालेल्या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या लोकांना वेगळे केले गेले आहे."



यापूर्वीही एका मोहोल्ला क्लिनिकच्या डॉक्टरला कोरोना


२६ मार्चला देखील मोहोल्ला क्लिनिकच्या एका डॉक्टरला कोरोना झाल्याचे आढळून आले होते. हि व्यक्ती यानंतर दिल्ली सरकारने मोहल्ला क्लिनिकच्या कोरोना-पीडित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या ८०० लोकांना वेगळे ठेवले आहे. सौदी अरेबियातील एका महिलेच्या संपर्कात आलेल्या या डॉक्टरला कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यांनतर त्यांची पत्नी व मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

@@AUTHORINFO_V1@@