कठीण समय येता, संघ कामास येतो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |
RSS Nashik_1  H
 
 



ट्रकचालकांच्या जेवणासाठी नाशिकमधील स्वयंसेवकांचा पुढाकार

नाशिक : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू झाली. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या सीमेवर आडगाव ट्रक टर्मिनल आणि विल्होळी ट्रक टर्मिनल, पुणे ट्रक टर्मिनल येथे साधारण ५५० ट्रक हे चालक आणि साहाय्यक यांच्यासोबत अडकलेले आहेत. 
 
 
 
या सर्व ट्रकचालक आणि साहाय्यकांना सिडको, इंदिरानगर, नाशिक रोड या भागातील १००० घरांतून डबे गोळा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीमार्फत ११५० पोळी-भाजी, लोणचे आणि चटणी या स्वरूपातील डब्यांचे वाटप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती आणि नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट संघटना यांच्या माध्यमातून करण्यात आले. काही चौकांत पोलिसांनासुद्धा या डब्याचे वाटप करण्यात आले.
 
 
या उपक्रमात भोसला, सातपूर, जुने नाशिक पंचवटी, आडगाव, म्हसरूळ आदी भागांतून डबे गोळा करण्यात येत आहेत. ज्या घरातून डबा देण्यात आला व देण्यात येणार आहे, त्या सर्व माऊलींचे खूप खूप अभिनंदन व त्यांना शतशः प्रणाम, असे म्हणत जनकल्याण समितीचे जिल्हा निधीप्रमुख अनिल चांदवडकर यांनी आभार मानले आहेत.


 
या कार्यात संघ स्वयंसेवक अनिल चांदवडकर, अमोल जोशी यांच्यासह अनेक स्वयंसेवक व जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष स्वयंसेवक राजेंद्र नाना फड व मार्गदर्शक सुभाष जांगडा व असोसिएशनचे कार्यकर्ते यांचा सहभाग होता.




@@AUTHORINFO_V1@@