आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांची सरकारी हॉस्पिटलला मास्क, ग्लोजची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |


IIT mumbai_1  H


मुंबई : हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मास्क आणि ग्लोव्हजच्या तुटवड्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी विविध विभागातून तब्बल ७ हजार ६०० ग्लोव्हज आणि २ हजार ९९० मास्क जमा करून पालिका हॉस्पिटलला दान दिले आहेत. तसेच इंजिनिअरिंगच्या इतर विद्यार्थ्यांनी देखील आपले वैयक्तिक किट सरकारी कर्मचाऱ्यांना दान करावे असे आवाहन केले.



देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था
, संघटना, विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत. सध्या देशात मास्क व ग्लोव्हजचा असलेला तुटवडा यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेले हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबईच्या ऑफिस ऑफ डीन स्टुडंट अफेअरच्या विद्यार्थ्यानी आयआयटीतील विविध विभागातून मास्क आणि ग्लोव्हज जमा करण्यास सुरुवात केली. या मोहिमेत स्टुडंट टास्क फोर्सचे सदस्य राधिक राममोहन, अक्षय नायर, गुरप्रित सिंग, यांच्याबरोबर इलेक्ट्रिक इंजिनियरिंग विभागातील भाव्या के. आणि अश्विनी जी हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वीच या मोहिमेला सुरुवात केली होती. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत लॅब व विभागामधील ग्लोव्हज आणि मास्क उपलब्ध करून दिले. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत मास्क शिवून विद्यार्थ्याना दिले. या उपक्रमाअंतर्गत अवघ्या काही दिवसांत विद्यार्थ्यानी तब्बल ७ हजार ६०० ग्लोव्हज आणि २ हजार ९९० मास्क जमा केले.



त्यानंतर विद्यार्थ्यानी मुंबई पालिका हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. रमेश भारमल आणि पालिकेच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत जमा केलेले मास्क आणि ग्लोव्हज मदत म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली. पालिकेने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने मास्क व ग्लोव्हज नेण्याची व्यवस्था करत
30 मार्चला सर्व मास्क व ग्लोव्हज ताब्यात घेतले. हा उपक्रम असाच सुरू ठेवण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणात मास्क व ग्लोव्हज उपलब्ध झाल्यास ते पुन्हा पालिका हॉस्पिटलला देण्यात येतील, अशी माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@