रा.स्व.संघातर्फे किन्नरांसाठी मदतीचा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |

Thane RSS swayansevk _1&n




ठाणे : लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या किन्नरांसाठी रा.स्व.संघ स्वयंसेवकांनी सामाजिक दायित्व दाखवत मदतीचा हात दिला आहे. संघाच्या ठाणे शहरातील स्वयंसेवकांनी किन्नरांच्या वस्त्यांवर जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे.
 
 
ठाण्यात बाळकुम, कशेळी, दुर्गेश पार्क, पाईपलाईन, दोस्ती, फुले नगर, साठे नगर, सावरकर नगर आदी भाग हा किन्नरांच्या वस्तीसाठी ओळखला जातो. संघ स्वयंसेवकांनी या वस्त्यांवर भेट देत त्यांची विचारपूस केली. लॉकडाऊनमुळे बंद झालेली मुंबई लोकल तसेच बंद असणारी दुकाने यामुळे किन्नरांची मोठी गैरसोय होत आहे. या सर्व वस्त्यांवर जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने वस्तूंचे वाटप पूर्ण केले. सर्वांनी रा.स्व.संघाचे आभार मानले.




@@AUTHORINFO_V1@@