मराठी कलाकारांचं वास्तव्य असलेलं बिंबीसारनगर सील!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |

bimbisaar_1  H

एकाच कुटुंबात चार जणांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात खळबळ!



मुंबई : ‘कोरोनाग्रस्त’ व्यक्ती आढळल्यामुळे मुंबईच्या गोरेगाव भागातील बिंबीसारनगर सील करण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आली आहे. या भागात अनेक मराठी कलाकारांचं वास्तव्य आहे.


मुंबईतील बिंबीसारनगरमध्ये सुबोध भावे, आतिशा नाईक, स्वप्नील जयकर यासारखे अनेक मराठी कलाकार राहतात. तर दिग्गज अभिनेते जयवंत वाडकर यांच्या बिल्डिंगमध्ये संबंधित ‘कोरोनाग्रस्त’ कुटुंब राहतं. ‘कोरोनाग्रस्त’ व्यक्ती आढळल्यामुळे कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.


लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या महिलेला कोरोना वायरसची लागण झाली आहे. त्यामुळेच तिच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ आणि नोकरालाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील चारही जणांना हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


महापालिकेच्या आरोग्य विभागाने समूह संसर्ग होऊ नये, यासाठी बिंबीसार नगरात प्रवेशबंदी केली. तर महापालिका आणि पोलिसांनी निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २८ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत, तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात कालच्या दिवसात सापडलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४७ वर गेली आहे.
@@AUTHORINFO_V1@@