दिल्लीत मुस्लीम धार्मिक मेळाव्यासाठी जमलेल्या २४ जणांना कोरोनाची लागण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020
Total Views |
delhi_1  H x W:



जगभरातील तब्बल एक हजार धर्मप्रचारक या मेळाव्यात सहभागी झाल्याने आकडा वाढण्याची शक्यता!

दिल्ली : दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरातील एका मरकेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक मेळाव्यात सहभागी झालेल्या २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात या धार्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील तब्बल १५०० धर्मप्रचारक या मेळाव्यात सहभागी झाले होते.


हा मेळावा संपल्यानंतर यापैकी अनेकजण भारतामधील विविध राज्यांमध्ये निघून गेले. मात्र, आता या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर होत आहे. जम्मू-काश्मीरमधील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ही बाब समोर आली होती. यानंतर तामिळनाडू, तेलंगणा, केरळ आणि पश्चिम बंगालमधील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले होते. हे सर्वजण दिल्लीतील मेळाव्यात सहभागी झाले होते.


सोमवारी या मेळाव्यात सहभागी झालेल्या २४ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. सध्या दिल्ली सरकराकडून हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. यानंतर आतापर्यंत अनेकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये २०० जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, दिल्ली सरकारने अजूनही याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्याच्या घडीला मरकेजमधील १०३३ लोकांना आयसोलेट करण्यात आले आहे. तर ३३४ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याशिवाय, ७०० जणांना क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आल्याचे समजते.


निझामुद्दीन परिसरात बंगलेवाली मशीद नावाने ओळखली जाणारी चार मजल्यांची इमारत आहे. हे तबलिगी जमातीचे मुख्य केंद्र (मरकेज) आहे. या इमारतीमध्ये जाण्यासाठी एकच अरूंद प्रवेशद्वार आहे. याठिकाणी इस्लामी धर्मप्रचारकांना शिक्षण दिले जाते. २४ मार्चला देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही अजूनही या इमारतीमध्ये तब्बल हजारभर लोक राहत असल्याचे समजते.
त्यामुळे या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. दिल्ली प्रशासनाने या मशिदीच्या मौलानांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आम्ही कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचे निझामुद्दीन मरकेजचे (केंद्र) म्हणणे आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आम्ही उर्वरित कार्यक्रम रद्द केला. मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याने अनेकजण याठिकाणी अडकून पडल्याचे स्पष्टीकरण निझामुद्दीन मरकेजने दिले आहे.


@@AUTHORINFO_V1@@