क्वारंटाईन रुग्ण पळून जात असल्यास मिळतो अलर्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |
Mobile App_1  H




 
भिलवाडा : राजस्थानातील भिलवाडा हे कोरोनाग्रस्तांच्या दृष्टीने देशातील संवेदनशील ठिकाण बनले आहे. या पार्श्वभूमीवर इथल्या ६ हजार ४४५ लोकांना क्वारंटाईल करण्यात आले आहे. विलगीकरण कक्षात इतक्या मोठ्या संख्येने असलेले हे रुग्ण आता पळून जाण्याची भीती उरलेली नाही, कारण पळून जाणाऱ्या रुग्णाला मोबाईल जीपीएस यंत्रणा आणि एका अॅपद्वारे पकडणे सोपे झाले आहे.
 
भिलवाडा प्रांतात दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाईक त्यांच्या संपर्कात आलेले आरोग्य विभागातील कर्मचारी डॉक्टर या सर्वांनाच आता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच इथे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. विलगीकरण कक्षात ठेवलेल्या सर्व जणांवर एका अॅपद्वारे नजर ठेवली जाणार आहे. या सर्वांची रोज दुपारी १२ वाजता माहिती घेतली जाते. तसेच यापैकी कुणीही घराबाहेर पडले तर त्वरित नियंत्रण कक्षापर्यंत याचा अलर्ट जातो. अशाच प्रकारे सर्व क्वारंटाईल रुग्णांची व्यवस्था व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र, हे अॅप कुणी विकसित केले किंवा तिथला नियंत्रण कक्ष कशाप्रकारे याबद्दल यंत्रणा हाताळत आहे याची विस्तृत माहिती समजू शकलेली नाही.
 
देशातील सर्वात मोठे स्क्रीनिंग

१९ मार्च रोजी या भागात सहा कोरोना रुग्ण आढळले. याच दिवसांपासून हा भाग तिसऱ्या टप्प्यात होता. या पार्श्वभूमीवर परिस्थिती आटोक्यात राहवी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच संचारबंदी लागू केली होती. आत्तापर्यंत इथे २४ लाख लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. यासाठी सहा हजार कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली होती.
 
पोलीसांकडून पुष्पगुच्छ देऊन विनंती

देशभरात जिथे पोलीसांचा दंडुक्याचा धाक आहे तिथे याच भागात पोलीसांनी फुले आणि पुष्पगुच्छ देऊन लोकांची समजूत काढली. घरीच थांबवण्याचे आवाहन केले.
 

१२०० कॅम्पमध्ये मजूरांची देखभाल

इतर राज्यांप्रमाणेच या भागातही मजूरांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, १२०० कॅम्पमध्ये इथल्या मजूरांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली तसेच सहा हजार मास्कही वाटण्यात आले.
 

सात रुग्ण झाले बरे

आत्तापर्यंत एकूण सात जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. इथेही आरोग्य प्रशासनावर ताण आहे. मात्र, डॉक्टर आणि परिचिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनीही घरी न जाता कायम सेवा सुरू ठेवली आहे.
@@AUTHORINFO_V1@@