कोरोनाच्या भीतीने केली आत्महत्या;मृत्यूनंतर टेस्ट आली निगेटीव्ह'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |
corona _1  H x
 
 
 
उडीपी : कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे लोकांना प्रचंड मानसिक त्रास होऊ लागला आहे. कोरोना असल्याची भीती, चुकीची माहिती आणि गैरसमज यामुळे कर्नाटकमधील उडपी गावात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या शवविच्छेदन अहवालात मात्र, तो कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
उडपीतील आरोग्य विभाग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनातील अहवालात व्यक्तीला कोरोना झाला नसल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. गोपालकृष्ण मडीवाला (वय ५६) यांनी गळफास घेत जीवन संपवले. कोरोना बाधित असल्याची भीती त्यांना वाटू लागली होती. मृत्यूपूर्वी लिहीलेल्या एका चिठ्ठीत मी माझ्या परिवाराच्या सुरक्षेसाठी हे सर्व केले असल्याचे म्हटले आहे.
 
 
वेळीच उपचार झाल्यास कोरोनाचा रुग्ण हा बरा होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे प्रशासन वेळोवेळी सांगत आहे. गेल्या काही दिवसांपासून विलकिकरण (क्वारंटाईल) ठेवण्यात आलेल्या कित्येक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@