पुण्यात कोरोनाचा पहिला बळी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |

Corona_1  H x W


पुणेकरांची चिंता वाढली

पुणे : पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित ५२ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे, तर महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या ९ वर पोहोचली आहे.


पुण्यात आज मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाला विविध व्याधी होत्या. त्यामध्ये त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्याने पुणेकरांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.


महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण
देशभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतरही ‘कोरोना’ग्रस्तांचे आकडे वाढतानाच दिसत आहेत. महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा २१५ वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकमध्ये गेल्या बारा तासात नवे रुग्ण सापडले आहेत.  पुण्यात ५, मुंबईत ३, नागपुरात २, तर कोल्हापूर-नाशिकमध्ये प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला आहे. आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे २६ नवे रुग्ण सापडले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@