कोरोना कहर - भाग-2

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |


corona animal_1 &nbs


या विषाणूचा प्रसार नक्की कशाप्रकारे होतो, याची निश्चित माहिती जरी उपलब्ध नसली तरी या लक्षणांचे स्वरुप पाहता शिंकणे, खोकणे यामार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा, असा एक प्राथमिक अंदाज आहे. यालाच 'Droplet infection' असेही म्हटले जाते. या विषाणूकरिता कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे कोणीही जर कोरोनाची लस देत असल्यास ती फसवेगिरी आहे, हे लक्षात ठेवावे. कोरोना विषाणू हा प्राणिजन्य आजार आहे. नवीन जनुकीय रचना असलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार नक्की कुठल्या प्राण्यापासून होतो, याची निश्चित अशी माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

 


कोरोना व्हायरस’ची लागण ही मुख्यत्वेकरून प्राण्यांपासून मानवी शरीरास होत असते. सखोल तपासण्यांनंतर असे लक्षात आले की, ‘कोरोना’ विषाणूची ’SARS-Cov’ ही प्रजाती मांजरापासून माणसाकडे पसरली, तर दुसरी प्रजाती ‘MERS-Cov' ही उंटांकडून माणसाकडे पसरली. याव्यतिरिक्त कोरोनाच्या अनेक प्रजाती प्राण्यांमध्ये सापडतात. परंतु, त्यांचा अजूनतरी मानवी शरीरात संसर्ग झालेला पाहण्यात येत नाही.

 

 


आता आपण या कोरोना व्हायरसची लक्षणे पाहू. सर्वसाधरणपणे या विषाणूची लागण झालेल्या माणसाला सर्वप्रथम श्वसनसंस्थेची निगडित अशी लक्षणे दिसू लागतात. याची सुरुवात ही साध्या सर्दीनेही होऊ शकते. सर्दी झाल्यापाठोपाठ मग खोकला होणे, छातीत कफ साचून राहणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. कफामुळे मग रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो व दम लागू लागतो. या लक्षणाच्या बरोबरीनेच मग ताप येऊ लागतो. यावेळेपर्यंत जर ताप व इतर लक्षणांचा उपचार केला गेला नाही, तर मग आजार बळवतो व विषाणूंचा संसर्ग थेट फुप्फुसांना होतो व न्यूमोनिया होऊ शकतो. चीनमध्ये व्हायरल न्यूमोनियाच्या अनेक केसेस पाहण्यात आल्या.
 
न्यूमोनियाच्या बरोबरीनेच संपूर्ण फुप्फुसेच निकामी होऊ शकतात व गंभीर स्वरुपाचा श्वसनसंस्थेचा आजार होऊ शकतो.काही रुग्णांमध्ये पचनसंस्थेशी निगडित अशी लक्षणेही दिसू शकतात. रुग्णांना पोटात जडपणा येऊन अपचन झाल्यासारखे होते व अतिसारासारखी लक्षणे दिसू लागतात. पचनसंस्थेनंतर या विषाणूच्या विळख्यात येते त म्हणजे मूत्रपिंड म्हणजेच किडनी. काही रुग्णांमध्ये मूत्रपिंडाचे विकार उद्भवू शकतात व गंभीर प्रकारात मूत्रपिंड निकामीसुद्धा होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींमध्ये असामान्य लक्षणे आढळू शकतात.
 
रोगप्रसार

 

 


साध्यासुद्धा सर्दी-खोकल्यापासून ते ‘मर्स’ किंवा ‘सार्स’सारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणार्‍या एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटास ‘कोरोना’ विषाणू असे म्हणतात. २००३ मध्ये आढळलेला ‘सार्स’ हादेखील एक प्रकारचा कोरोना विषाणूच होता. सध्या चीनमध्ये उद्रेकात आढळलेला हा विषाणू ‘कोरोना’ विषाणूच आहे. तथापि, त्याची जनुकीय रचना पूर्णपणे नवीन असल्याने त्यास ‘नॉव्हेल कोरोना’ विषाणू असे नाव देण्यात आले.

या विषाणूचा प्रसार नक्की कशाप्रकारे होतो, याची निश्चित माहिती जरी उपलब्ध नसली तरी या लक्षणांचे स्वरुप पाहता शिंकणे, खोकणे यामार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा, असा एक प्राथमिक अंदाज आहे. यालाच 'Droplet infection' असेही म्हटले जाते. या विषाणूकरिता कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे कोणीही जर कोरोनाची लस देत असल्यास ती फसवेगिरी आहे, हे लक्षात ठेवावे. कोरोना विषाणू हा प्राणिजन्य आजार आहे. नवीन जनुकीय रचना असलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार नक्की कुठल्या प्राण्यापासून होतो, याची निश्चित अशी माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पुढील भागात आपण या विषाणूच्या प्रतिवाद्यांची कशी काळजी घ्यावी व काय उपचार करावे ते पाहूया. (क्रमश:)
 
 

 

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

 

@@AUTHORINFO_V1@@