धक्कादायक ! पहिल्याच दिवशी 'लीक' झाला दहावीचा पेपर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2020
Total Views |

jalgaon_1  H x
जळगाव : शैक्षणिक टप्प्यामध्ये महत्वाची मानली जाणारी परीक्षा म्हणजे दहावीची बोर्डाची परीक्षा. मंगलवारपासून महाराष्ट्रभर दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहिलाच पेपर मराठीचा होता. परंतु, पहिल्याच दिवशी हा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली. जळगावामधील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला. महत्वाचे म्हणजे फुटलेला पेपर कॉपी करणाऱ्या मुलांच्या व्हॉट्सअपवर पोहोचला होता.
 
 
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. ३ मार्च ते २३ मार्च २०२० या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. यंदा राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यात ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६५ हजार परीक्षार्थींची वाढ आहे. तर ८० उपद्रवी केंद्र असून नाशिक विभागात सर्वाधिक आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@