पंतप्रधान मोदींच्या ट्विटने चर्चा जोरात ; सोशल मीडियाचा त्याग करणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2020
Total Views |

pm modi_1  H x
 
 
नवी दिल्ली : सध्या फेसबुक, ट्विटरसारखे सोशल माध्यम हे राजकारण्यांच्या प्रचारासाठी महत्वाचा भाग आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब हे त्यासाठी प्रभावी व्यासपीठ समजले जाते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या माध्यमांचा प्रभावीपणे वापर करतात. परंतु, त्यांनी सोमवारी केलेल्या ट्विटमुळे सगळीकडे जोरदार चर्चा सुरु झाली.
 
 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी , 'या रविवारी मी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यावरील माझी खाती सोडण्याचा विचार करत आहे.' असे ट्विट केले आणि चर्चेला उधाण आले. मोदींनी असे अचानक सोशल मीडिया सोडण्याचा विचार व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे राजकीय नेते आहेत. इंस्टाग्रामवर ३ कोटी ५२ लाख, ट्विटरवर ५ कोटी ३३ लाख आणि फेसबुकवर ४ कोटी ४५ लाख फॉलोवर आहे, तर त्यांच्या यूट्यूब चॅनेलला ४५ लाख सबस्क्राईबर आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@