भारताच्या इतिहासलेखनात भारताचा आत्मा दिसला पाहिजे : डॉ. बालमुकुंद पाण्डेय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2020
Total Views |
VSK _1  H x W:
 
 
 



मुंबई : "भारताच्या गेल्या हजार बाराशे वर्षात लिहिल्या गेलेल्या इतिहासात भारताचा आत्मा कुठेच दिसत नाही. या काळात जो इतिहास लिहिला गेला तो आधी मोगलांची राजवट आणि नंतर पोर्तुगीज व ब्रिटीशांची राजवट बळकट करण्याच्या हेतूने लिहिला गेला. त्या इतिहासात भारत व भारतीय समाजातील दोष, उणीवा आणि कालबाह्य रूढी व परंपरा यांच्यावरच भर दिला गेला."

 
"याचा परिणाम म्हणून या काळात शिकून सवरून मोठ्या झालेल्यांच्या मनात आपला भारत देश, समाज, संस्कृती, इतिहास यांच्याबद्दल प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला व त्याच बरोबर परकीय राजवटींबाबत श्रेष्ठतेची भावना देशभरात निर्माण झाली. हे चित्र बदलायचे असेल तर भारताच्या इतिहास लेखनात भारताचा आत्मा दिसला पाहिजे" असे प्रतिपादन अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. बालमुकुंद पांडेय यांनी येथे केले.
 
इतिहास संकलन समिती कोकण प्रांत (बोरिवली भाग) यांच्यावतीने सोडावाला शाळेमध्ये आयोजित केलेल्या "वर्तमान संदर्भात भारताचा इतिहास" या विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोरेगाव विभागाचे संघचालक डॉ. विष्णू वझे उपस्थित होते. प्रसिद्ध इतिहास व पुरातत्वज्ञ डॉक्टर सूरज पंडीत हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. जैन मुनी श्री प्रशमरत्न विजयजी महाराज यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.

 
डॉ. बालमुकुंदजी म्हणाले की, 'स्वातंत्र्यानंतरच्या काळातही हेच परकीयांना धार्जिणे असणारे धोरण समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात राबवण्यात आले. हे चित्र बदललेच पाहिजे. यासाठी आपली शिक्षण व्यवस्था, शिक्षणाचा आशय, शिक्षकांची व विद्यार्थ्यांची मानसिकता बदलणारा इतिहास लिहिला पाहिजे व शिकवला पाहिजे. आणि हेच काम अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेच्या मार्गदर्शनाखाली देशभरातल्या सर्व राज्य, प्रान्त, जिल्हा व स्थानिक स्तरावरील संलग्न समित्या सातत्याने करीत आलेल्या आहेत'.

 
अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर गिरीशभाई ठाकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ते म्हणाले की, आपल्या राष्ट्राचा मूळ इतिहास समजून घ्यायचा असेल तर वेद, उपनिषदे, पुराणे, व रामायण महाभारतातील महापुरुषांच्या व स्त्रियांच्या जीवनांचा, संतांचा, समाज सुधारकांचा व वैज्ञानिकांचा अभ्यास केला पाहिजे. या प्रसंगी विशेष निमंत्रित असलेले जैन मुनी श्री प्रशमरत्न विजयजी महाराज आपल्या उद्बोधनात म्हणाले की, आपला धर्म, संस्कृती व इतिहास यांची नीट जाणीव करून देण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था आपल्या मातृभाषेतून शिक्षण व संस्कार देणारी असली पाहिजे. या व्याख्यानाला दहिसर बोरीवली भागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


@@AUTHORINFO_V1@@