लॉकडाऊननंतरही पुरेल एवढा इंधनसाठा ; गॅस बुकिंगसाठी धावाधाव नको

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2020
Total Views |

oil_1  H x W: 0
नवी दिल्ली : कोरोनामुळे सर्व देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांनी अनेक ठिकाणी इंधन साठयाचा तुटवडा पडणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. अशामध्ये भारतीय ऑइल कॉर्पोरेशनचे चेअरमन संजीव सिंह यांनी सांगितले की, “जगातील तिसरा सर्वांत मोठा इंधनाचा ग्राहक देश असणाऱ्या भारताकडे पेट्रोल, डिझेल तसेच नैसर्गिक वायूचा पुरेसा साठा आहे. तो लॉकडाउनचे तीन आठवडे सहज पुरू शकतो. एवढेच नव्हे तर लॉकडाऊननंतरही हा साठा पुरेसा आहे.” भारताचे खनिज तेल निर्मिती आणि पुरवठा करणारे प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
सध्या भारताकडे नैसर्गिक वायू पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने लोकांनी उगाच स्वयंपाकाच्या गॅसचे बुकिंग करण्यासाठी धावाधाव करू नये. संपूर्ण एप्रिल महिना आणि त्यानंतर देखील नेमके किती इंधन लागेल याचा अंदाज आम्ही घेतला आहे. आमचे तेलशुद्धीकरण कारखाने मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत. सध्याही गरजेनुसार नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचा पुरवठा होतो आहे असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे देशभरातील तेलाच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणारे संजीव सिंह यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. पण वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवून ते कामाला लागले आहेत. सध्या देशभरातील इंधन पुरवठ्यावर देखरेख करण्याचे त्यांचे नियोजन करण्याचे काम ते करतात.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@