मुंबईत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2020
Total Views |
covid-19_1  H x

मुंबई : मुंबईत कोरोनाग्रस्त ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू होते. राज्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या आता सातवर येऊन पोहोचली आहे. हायपरटेन्शनचा विकार असलेल्या महिलेला शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन-चार दिवसांपासून त्या महिलेच्या छातीत दुखत होते.

तिला श्वासोच्छवासाचा त्रासही जाणवत होता. रुग्णलयात दाखल करतेवेळी तिची प्रकृती अत्यावस्थ होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

लोकांनी सरकारचे आवाहन गंभीरतेने न घेतल्याने देशभरातील कोरोना रुग्णाचा आकडा वाढला आहे. राज्यातही आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १९३ वर पोहोचली आहे. एकूण सात जणांच्या कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यात मुंबईतील चौघांचा तर पुणे, नागपूर व सांगलीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सांगलीत इस्लामपूरमध्ये एकाच घरातील २३ जणांना करोना झाला आहे. यामुळे येथील अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.




@@AUTHORINFO_V1@@