लॉकडाऊनसारख्या निर्णयावर पंतप्रधान मोदींनी मागितली माफी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2020
Total Views |

pm modi apologies_1 
 
 
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगासह संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळत आहे. यावर उपाययोजना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत भारतामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ या त्यांच्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण भारतात लॉकडाऊनसारखा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण देशाची माफी मागितली. 


मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे. ही लढाई जिंकण्यासाठी लक्ष्मण रेषा पाळायला हवी. काही नागरीक अजूनही लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाही आहेत. कोरोनामुळे कठोर निर्णय घेतले त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना त्रास झाला, याबद्दल माफी मागतो. जर नियमांचे पालन केले नाही तर कोरोनापासून स्वतःचा बचाव करणे कठीण होणार आहे. त्यामुळे सरकार आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करा.” असे भावनिक आवाहन केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@