कुणीही उपाशी झोपणार नाही !

    29-Mar-2020
Total Views |

my green society _1 



केशव सृष्टी, माय ग्रीन सोसायटी, रा. स्व.संघाच्या जनकल्याण समिती मुंबईचा  संयुक्त उपक्रम


मुंबई
: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कर्फ्युमुळे हातावर पोट असणाऱ्यांना जगणे असह्य झाले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर काही जणांना स्वच्छतेच्या साधनांचीही चणचण आहे. केशव सृष्टी, माय ग्रीन सोसायटी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती मुंबईच्या वतीने मुंबईतील झोपडपट्टीत २००० हून अधिक कुटुंबांना अन्नधान्याचे पाकीट वितरित करण्यात येत आहे. 



त्याशिवाय बेघर, झोपडपट्टीवासीय, महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज २५ हजार तयार अन्नाच्या पाकीटांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच कस्तुरबा आणि नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मास्क आणि इतर आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.