स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2020
Total Views |
maria_1  H x W:
 


मादिद्र : स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा ऑफ बोरबन-परमा हीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे मृत पावलेली ही शाही घराण्यातील पहिली सदस्य आहे. स्पेनचे सहावे राजा हे या ८६ वर्षीय राजकुमारीचे चुतल बंधू आहेत. तिचे बंधू सिक्सटो एनरिक डी बोरबोन, ड्यूक ऑफ अरेंज्यूज यांनी फेसबूक पोस्टद्वारे ही माहिती दिली. गेल्या काही दिवासांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
 
प्रिंस सिक्सटो म्हणाले कि, "आज दुपारी आमची बहिण मारिया टेरेसा डे बॉर्बन-परमा एण्ड बॉर्बन बुसेट ज्या कोरोना विषाणूबाधित होत्या त्यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले." स्पेनचे सहावे राजा किंग फेलिप यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती.
 
राजकुमारी मारिया यांचा जन्म २८ जुलै १९३३ रोजी झाला होता. फ्रान्समध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले तर मादिद्र येथील कॉम्प्लूटेंस विद्यापीठात त्या प्राध्यापक होत्या. सामाजिक कार्यामुळे त्यांना रेड प्रिंसेस असेही संबोधले जात होते. शुक्रवारी मादिद्र येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी त्यांच्यावर केलेली कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.
@@AUTHORINFO_V1@@