रेल्वे आली धावून; रेल्वेच्या डब्यांचे कोरोना वाॅर्डमध्ये रुपांतर

    28-Mar-2020
Total Views |
railway_1  H x
 
 
 

कोरोना रुग्णांचे उपचार आणि विलिगीकरण शक्य

 
 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी भारतीय रेल्वे धावून आली आहे. रेल्वे विभागाने आपल्या रेल्वे गाड्यांच्या डब्यांचे रुपांतर आयसोलेशन वाॅर्डमध्ये केले आहे. त्यामुळे यापुढे हे डब्बे कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करण्यासाठी किंवा त्यांच्या विलिगीकरणासाठी उपयोगात येणार आहे.
 
 
 
 
 
 
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत भर होत आहे. लाॅकडाऊन मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. रेल्वे सेवाही ठप्प आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या किंवा संशयितांच्या उपाचारासाठी आणि विलिगीकरणासाठी भारतीय रेल्वे धावून आली आहे. त्यांनी बंद केलेल्या रेल्वेचे रिकामी डब्ब्यांचे रुपांतर विलिगीकरण वाॅर्ड मध्ये केले आहे. यासाठी स्लिपर कोचचा वापर करण्यात आला आहे. डब्यातील प्रत्येक स्लिपिंग विभागाचा एक वाॅर्ड करण्यात आला आहे. त्यामध्ये सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. रुग्णांबरोबच डाॅक्टर आणि नर्स यांनाही वेगळा विभाग करुन देण्यात आला आहे. यांसर्दभातील माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी टि्व्ट करुन दिली.