कोरोनाशी लढण्यासाठी टाटांकडून ५०० कोटींची मदत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2020
Total Views |

RATAN TATA_1  H


कोरोनाग्रस्त आणि डॉक्टरांसाठी देणार मोफत जेवण


मुंबई : देशभरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. आतापर्यंत ८००पेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक उद्योगपती पुढे सरसावत आहेत. अशातच टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला ५०० कोटीची मदत करण्याचे जाहीर केले आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा म्हणाले की, कोरोनाशी लढण्यासाठी आपत्कालीन संसाधने लवकरात लवकर पुरवावीत.


कोरोनावर मात करण्यासाठी देशातील सर्व रुग्णालयीतल डॉक्टर, नर्स आणि इतर मेडिकल कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. ते आपल्या जीवाची आणि कु्टुंबाची पर्वा न करत अहोरात्र झटत आहेत. संसर्गाचा धोक्या असल्यामुळे अनेकजण आपल्या घरी देखील जात नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना दोनवेळचे जेवणही व्यवस्थित मिळत नाही. अशावेळी टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलने मुंबईतील मेडिकल कर्मचारी, रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.


यापूर्वी वेदांत ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनी एका महिन्याचा पगार देणार असल्याचे सांगितले होते. तर पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.


रिलायन्स ग्रुपने मुंबईत बीएमसीच्या मदतीने कोरोनासाठी स्पेशल १०० बेडचे हॉस्पिटल उभारले आहे. बीएमसीच्या मदतीने फक्त दोन आठवड्यात हे हॉस्पिटल तयार केले. या हॉस्पिटलचे नाव देखील कोविड-१९ ठेवले आहे.
@@AUTHORINFO_V1@@