‘ओला’च्या सीईओंचा चालकांना मदतीचा हात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2020
Total Views |

ceo_1  H x W: 0



स्वतःचा वर्षभराचा पगार देणार चालकांना!


मुंबई : कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन आता सर्वांनी मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली आहे. याचा संकटाचा सर्वाधिक फटका रोजंदारीवर काम करणाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न येत्या काळात गंभीर होणार आहे. टॅक्सी सेवा 'ओला'चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश आगरवाल यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्षभराचे आपले संपूर्ण वेतन न घेण्याचा आणि त्यातून ओलाच्या वाहनचालकांना मदत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.


ओलाच्या वाहनचालकांना मदत मिळावी, यासाठी एक मदत निधी गोळा करण्यासही सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या कुटूंबांमध्ये उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. त्यांना या निधीचा उपयोग होऊ शकेल.





आगरवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हजारो वाहनचालक आणि त्यांचे कुटुंबीय सध्या कोणत्याही उत्पन्नाशिवाय दिवस काढत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही निधी गोळा करण्यास सुरुवात करीत आहोत. याच निधीसाठी मी माझे पुढील वर्षाचे संपूर्ण वेतन देण्याचे निश्चित केले आहे. ओलाचे सर्व कर्मचारी या निधीसाठी पैसे देतील. २० कोटी रुपयांचा निधी जमविण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे.


अगदी कमीत कमी केलेली मदतही या निधीसाठी खूप उपयुक्त असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या निधीसाठी पैसे द्यावेत, अशी आमची विनंती आहे, असेही भाविश आगरवाल यांनी म्हटले आहे. देशातील २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खासगी आणि ऍपआधारित टॅक्सी सेवा तूर्त बंद आहे. याचा मोठा परिणाम या टॅक्सीचालकांवर झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@