राज्यात आणखी नवे ६ कोरोनाग्रस्त ; आकडा १५९वर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2020
Total Views |

corona_1  H x W


मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्राज्या सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. केंद्राने देशभरात लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णांची संख्या मंदावली जरी असली तरी अद्याप कोरोनावर वचक बसला नाही. नागरिकांकडून काही ठिकाणी लॉकडाऊनचे पालन करताना दिसत नाहीत. दरम्यान, शनिवारी राज्यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील ५ तर नागपूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे.
 
 
 
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता १५९ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बातमी सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नागरिकांनी सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिक घरात बसले नाहीत, अथवा लॉकडाऊनचे नियम पाळले नाही तर कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे. मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान लोकांना घरी थांबण्याचे आवाहन लोकांना वेळोवेळी करत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@