खाकीतील माणुसकी ! पाकच्या शरणार्थींची घेणार जबाबदारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2020
Total Views |

Delhi police_1  
नवी दिल्ली : कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतामध्ये २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण या लॉकडाऊनमुळे काही जनाचे हाल झाले आहेत. अशावेळी खाकी वर्दीतील काही पोलिसांनी गरजू लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. मजीलीस पार्क येथील शिबीरामध्ये २८० शरणार्थींची कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी उत्तर पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त विजयंता आर्या आणि त्यांच्या टीमने घेतली आहे.
 
 
 
पोलिसांच्या या माणुसकीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. सर्वांनी एकत्र मिळून करोना व्हायरसचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहेत. गरजूंना मदत करणे ही सामूहिक जबाबदारी आहे असे दिल्लीच्या पोलीस उपायुक्त आर्या यांनी सांगितले. “लॉकडाउनमुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाला आहे. हे लोक अडचणीत असल्याचे आम्हाला समजले. पुढचे २१ दिवस या कॅम्पमधील शरणार्थींची मदत करण्चाचा आम्ही निर्णय घेतला आहे. अन्न आणि औषधांसह सर्व जीवनावश्यक वस्तूंचा आम्ही त्यांना पुरवठा करणार आहोत” असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@