'सीएए'ला विरोध करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020
Total Views |
Girl who dead in gurudwar
 
 
 
 

बाबा मला वाचवा म्हणणाऱ्या मुलीच्या डोक्यात दहशतवाद्यांनी झाडली गोळी

 
 
काबुल : आठवडाभरात अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांचे दोन हल्ले झाले आहेत. बुधवारी जिथे गुरुद्वारेत हल्ला झाला. त्यानंतर जिथे मृत झालेल्या शिख बांधवांचा अंतिम संस्कार केला जात होता. त्याठिकाणाहून ५० मीटर अंतरावर गुरुवारी दुसरा हल्ला झाला. यात काही मुले जखमी झाली आहेत. जग कोरोनाशी लढा देत असतानाही दहशतवादी संघटनांमुळे अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकाना अशा यातना भोगाव्या लागत आहेत.
 
 
 
'माझी मुलगी सांगत होती बाबा मला वाचवा पण माझ्या समोर माझ्या मुलीच्या डोक्यात गोळी घालण्यात आली', अशा भावना दहशतवाद्यांसमोर हरलेल्या बापाने व्यक्त केल्या. त्याच्या मुलीचा चौथा वाढदिवस १० दिवसांनी येणार होता. आपल्या वाढदिवसाची तयारी करण्यासाठी एवढ्याशा चिमुकलीची लगबग सुरू होती. काही पैसे तिने वाढदिवसासाठी साठवून ठेवले होते. मात्र, त्या बंदुकीच्या एका गोळीने या सर्व आशा धुळीत मिळवल्या आणि एका बापाने आपल्या मुलीचा जीव जाताना आपल्या डोळ्यासमोर पाहिला. "बाबा मला वाचवा, यांच्या तावडीतून सोडवा", अशी आर्त हाक ती मारत राहीली मात्र, हतबल झालेल्या बापाला हा मृत्यूचा नंगानाच उघड्या डोळ्यांनी बघण्याविना काहीच पर्याय नियतीने समोर ठेवला नव्हता.
 
 
 
अफगाणिस्तानातील काबुलमध्ये २५ मार्च रोजी दहशतवादी हल्ला झाला. यात २६ शिखांची हत्या झाली. यात तीन वर्षांची तान्या आणि तिची आई सुरपाल कौल हिचाही सामावेश होता. तिचे वडिल हरिंदर सिंह सोनी (४०) यांनी सांगितले की, दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या वाढदिवसाची सर्व तयारी तिने पूर्ण केली होती. मात्र, त्याच आधी तिच्यावर अशाप्रकारे अंत्यसंस्कार करण्याची वेळ येईल, असं मला वाटलंही नव्हतं. आयुष्यभर तिच्या त्या किंकाळ्या माझ्या कानात घुटमळत राहतील. आम्हाला हा देश सोडून जायचा आहे. एका हल्ल्याने आमचं सारंकाही उध्वस्त केलं आहे. गेली ४० वर्षे हरिंदर सिंह अफगाणिस्तानात राहतात. मात्र, त्यांना हा देश आता आपलासा वाटत नाही. जिथे आसरा मिळेल तिथे राहू परंतू आम्ही आता इथे राहणार नाही, अशी प्रतिक्रीया त्यांनी या हल्ल्यानंतर व्यक्त केली आहे.
 
 
 
असेच कटू अनुभव आणखी बऱ्याच जणांना आले आहेत. एका मुलीने आपल्या आईच्या शवपेटीवर डोके ठेवून रडत प्रश्न विचारला. माझी आई काहीच का बोलत नाही, तिने काय पाप केलं होतं. मला सांगाल का ?, हल्ल्यावेळी उपस्थित असणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मनुष्याच्या रुपात हैवान तिथे आले होते. त्यांनी लहान मुलांनाही सोडले नाही, सर्वांना थेट गोळ्या घातल्या.'
 
 
 
 

 Terrorist attack affecte 
@@AUTHORINFO_V1@@