ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020
Total Views |

boris johnson_1 &nbs



लंडन
: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्याला काही लक्षणे जाणवत असून स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितले आहे. याआधी ब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी कोरोनाची लागण झाल्याने खळबल उडाली होती. शाही राजघराण्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.




बोरिस जॉन्सन यांनी ट्विटमध्ये म्हणतात की, “गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणे जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे. आपण सध्या करोना व्हायरसशी लढा देत असून मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचे नेतृत्त करत राहणार आहे”.


याआधी बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनीही ट्विटरवरही माहिती दिली. कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच त्यांनी स्वत:ला घरातच विलग ठेवले होते. त्यानंतर त्यांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. सध्या नदीन डॉरिस ह्यांची प्रकृती चांगली असून त्यांनी काही दिवसांपूर्वीच कामकाजाला सुरुवात केली आहे. त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ही हजेरी लावली. त्यावेळी सभागृहात त्यांचे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी स्वागत केले
@@AUTHORINFO_V1@@