कोरोनाशी लढण्यास आता आरबीआयही सज्ज ! रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात घट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020
Total Views |


RBI_1  H x W: 0
 
 


मुंबई
: जगभरामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव अजूनही जाणवत आहे. तसेच जगातील अर्थव्यवस्थेवर याचा चांगलाच प्रभाव पडला आहे. इतर देशांप्रमाणे आता भारतानेही कोरोनाशी लढण्यास कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेपो दरात कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
 
 
> कर्जवसूलीस स्थगिती...
 
पुढील तीन महिन्यांपर्यंत बँकांनी कर्ज, आणि त्यावरील व्याज तसेच हफ्त्यांची वसूली करू नये, असे निर्देश आरबीआयने देशभरातील बँकांना दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
 
> रेपो रेटमध्ये सूट...
 
रेपो रेट हा ७५ बेसिस पॉइंट्सनी कमी करून, ४.४ टक्क्यांवर आणला आहे. तर रिवर्स रेपो रेट हा ९० बेसिस पॉइंट्सनी कमी करून ४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
 
> कॅश रिझर्व्ह रेशिओ (सीआरआर) मध्ये कपात...
 
देशातील सर्व बॅंकांचा सीआरआर हा १०० बेसिस पॉइंट्सनी कमी करत नेट डिमांड आणि टाईम लायबलिटीच्या ३ टक्क्यांवर आणला गेला आहे. २८ मार्चच्या पंधरवड्यापासून एका वर्षाच्या कालावधीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
> कच्च्या तेलांचे दर घटण्याची शक्यता...
 
कोरोनाचा जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होतो आहे. याचा एकत्रित परिणाम भविष्यात काय असेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र एक नक्की, की यामुळे कच्च्या तेलांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे, जी चांगली गोष्ट आहे, असेही दास म्हटले.
 
 
 
जाणून घ्या थोडक्यात शक्तीकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :
 
 
> कोरोनामुळे रेपो आणि रिव्हर्स रेपोमध्ये घट
 
 
> रिव्हर्स रेपो रेटमध्ये ९० बेसीक पॉईंटची घट
 
 
> रिव्हर्स रेपो गर ४.९० वरुन ४
 
 
> रेपो रेट ७५ बेसीक पॉईंटची घट
 
 
> रेपो रेट ५.१५ वरुन ४.४ (०.७५ टक्के व्याज दरात कपात)
 
 
> अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरावर घटव्याज दर कमी केल्याने हफ्त्याची रक्कम कमी होणार (इएमआय रक्कम कमी होणार)
 
 
> कोरोनाचा अनेक क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका
 
 
> कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम
 
 
> जीडीपीचे अपेक्षीत उद्दीष्ट गाठणे सध्या आव्हानात्मक
 
 
> कोरोनामुळे मागणी कमी होऊन महागाई वाढण्याची शक्यता
 
 
> कोरोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@