भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन नमस्ते'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020
Total Views |


defence_1  H x



नवी दिल्ली : भारतीय लष्कराने कोविड १९शी दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्यदले तयार असल्याची माहिती सैन्यदल प्रमुख मुकुंद नरवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच कोरोनाशी लढा देण्यासाठी उभारलेल्या अभियानाला 'ऑपरेशन नमस्ते' नाव दिले आहे. त्यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना या मोहिमेची माहिती दिली.


ते म्हणाले
,"आमच्याकडे आपातकालीन योजना तयार आहे. करोना व्हायरसच्या फैलावामुळे लष्कराच्या कार्यक्षमतेवर कुठलाही परिणाम होणार नाही असे नरवणे म्हणाले. ज्या गोष्टी पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्या परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा नव्याने आखणी केली जाईलअसे नरवणे म्हणाले.




तसेच मानेसर, जैसलमेर आणि जोधपूर येथे लष्कराने क्वारंटाइन केंद्रे उभारली आहेत. चीन, इटली आणि इराणहून आणलेल्या भारतीयांना इथे ठेवण्यात आले होते. आणखी चार ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्यात येणार आहेत अशी माहिती नरवणे यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@