‘या’ देशात सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांना सरकार देणार शिक्षा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020
Total Views |
Singapore_1  H


अंतर ठेवून न वावरल्यास सहा महिने कोठडी आणि सात हजार डॉलरचा दंड

सिंगापूर : कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी वेगवेगळ्या देशांकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचवेळी काही देशांनी आणखी गंभीर उपाय योजण्यासही सुरुवात केली आहे. सिंगापूरने या लढ्यामध्ये एक गंभीर नियम केला आहे. सोशल डिस्टन्सिंग (दोन व्यक्तींमधील सुमारे १ मीटरचे अंतर) न पाळणाऱ्यांना सिंगापूरमध्ये यापुढे सात हजार डॉलरचा दंड आणि सहा महिन्यांपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. शुक्रवारपासूनच सिंगापूरमध्ये हा नवा नियम अंमलात आला आहे.


सिंगापूरमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे कोरोनाविरोधातील लढाईसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंगापूरमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. अर्थात त्यांचे प्रमाण परदेशातून सिंगापूरमध्ये आलेल्यांमध्ये जास्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिंगापूरमधील सरकारने हा नवीन नियम केला आहे.


सिंगापूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणीही दुसऱ्या व्यक्तीपासून एक मीटर अंतरावर उभा राहिला नाही किंवा बसला नाही तर त्याला या प्रकरणी दोषी ठरविण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात निर्देश जारी केले आहेत. त्याचबरोबर काही सार्वजनिक ठिकाणी असलेल्या खुर्च्यांवर सरकारने एक चिन्ह रेखाटले आहे. त्या ठिकाणी बसलेल्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत हे नियम अंमलात असतील. सर्व नागरिकांना, प्रवाशांना आणि व्यावसायिकांना ते पाळणे बंधनकारक आहे.
@@AUTHORINFO_V1@@