चांगली बातमी ! पिंपरी-चिंचवडमधील ते तिघे कोरोनामुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020
Total Views |

pimpri_1  H x W
 
 
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये सापडलेल्या पहिल्या ३ रुग्णांची १४ दिवसानंतरच्या चाचणीचे अहवाल समोर आले. १४ दिवसांनंतर करण्यात आलेल्या दोन चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना आज घरी सोडण्यात येऊ शकते अशी माहिती महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १२ रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या तिघांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
 
महाराष्ट्रामध्ये पिंपरी-चिंचवड येथे सुरुवातीला सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर राज्य सरकारने महापालिका प्रशासनासोबत मिळून अनेक उपाययोजना केल्या. १० मार्चला मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरोना बाधित दाम्पत्याच्या संपर्कात येऊन पिंपरी-चिंचवडमधील तिघांना कोरोनाची लागण झाली होती. या तिघांवरही महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अथक प्रयत्न करून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. यानंतर गुरुवारी १४ दिवसानंतर त्यांची पहिली चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. गुरवारी दुसऱ्या चाचणीचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@