गो एअरकडूनही सरकारला मदतीचा प्रस्ताव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020
Total Views |
go air_1  H x W


आपत्कालीन सेवांसाठी आणि परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी करणार मदत

दिल्ली : कोरोना विषाणूच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीदरम्यान इंडिगो या विमान कंपनीनंतर गोएअरनेही मदतीचा प्रस्ताव दिला आहे. आपात्कालीन सेवा आणि दुसऱ्या देशातील भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदतीस तयार असल्याचे गोएअरने म्हटले आहे. कंपनीने विमान आणि क्रू सदस्य उपलब्ध करुन दिले जातील असेही म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी इंडिगोनेही असाच प्रस्ताव सादर केला होता.


याचदरम्यान, जर सरकारने परवानगी दिली तर बिहारच्या प्रवाशी कामगारांसाठी स्पाइसजेट दिल्ली/मुंबई येथून पाटणासाठी विमान वाहतूक करण्यास तयार असल्याचे स्पाइसजेटचे सीएमडी अजयसिंह यांनी म्हटले आहे.


गोएअरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने नागरी विमान उड्डाण मंत्रालय आणि डीजीसीएशी संपर्क केला आहे. देशातील लॉकडाऊन पाहता आमचा सेवा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतात २४ मार्चला मध्यरात्रीपासून देशांतर्गत प्रवासी वाहतुकीवर बंदी घातली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाण २१ मार्चच्या रात्री दीडपासून बंद केले आहेत.


दरम्यान, भारताने मोठ्या संख्येने विदेशात फसलेल्या भारतीय नागरिकांना देशात पुन्हा आणले आहे. चीन आणि इराणमधून एअर इंडिया आणि एअर फोर्सच्या मदतीने भारतात सर्वांना परत आणले आहे. आता खासगी कंपन्यांनी मदतीचा प्रस्ताव दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@