प्राण्यांना खाऊन पोट भरले; आता कोरोनाच्या उपचारासाठी चीनकडून अस्लवांच्या पित्ताची शिफारस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020   
Total Views |
corona_1  H x W
 
 
 

'चायना नॅशनल हॅल्थ कमिशन'कडून सरकारकडे शिफारस

 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसच्या हाहाकारानंतर जीवंत वन्यजीवांना खाणे आणि त्यांच्या तस्करीवर बंदी आणण्याचा निर्णय घेऊन एका महिना उलटत असतानाच चीन सरकारने आपला दुटप्पीपणा दाखवला आहे. कोरोना व्हायरसच्या गंभीर प्रकरणांवर उपचार करण्यासाठी अस्वलाच्या पित्त असलेल्या 'टॅन रे किंग' या इंजेक्शनचा वापर करण्याची शिफारस चीन सरकारने केली आहे. 'चायना नॅशनल हॅल्थ कमिशन'ने सरकारकडे ही शिफासर केली आहे. यामध्ये चिनी पारंपारिक आणि काही पाश्चात्य औषधे वापरण्याच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. मात्र, एकीकडे वन्यजीवांना खाण्यावर बंदी आणायची आणि दुसरीकडे त्या जीवांच्या अवयवांच्या व्यापाराला चालना देणारी चिनची ही वृत्ती विरोधाभास दर्शविणारी आहे.
 
 
अस्वलाचे पित्त हे एक पाचक द्रव आहे. जे अस्वल प्रजातींमध्ये यकृतात तयार होते आणि मूत्राशयात साठवले जाते. आठव्या शतकापासून चिनी पारंपारिक औषधांमध्ये या पित्ताचा वापर करण्यात येत आहे. कारण, या पित्तामधील 'यूरोडेक्सिचोलिक अॅसिड' हे ताप, यकृत आणि डोळ्यांच्या आजारावर परिणामकारक ठरत असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. गेल्या अनेक दशकांपासून 'यूरोडेक्सिचोलिक अॅसिड' हे सिन्थेटिक ड्रग म्हणून उपलब्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, कोरोना व्हायरसर उपाचार ठरू शकणारी लस अस्तिवात नाही. तरी वेदनाशमन आणि खोकल्यावरची काही औषध या आजराच्या संबंधित लक्षणांवर उपचार करु शकतात. ब्राँकायटिस आणि श्वसनासंबंधी आजाराच्या उपचारासाठी चिनी पारंपारिक औषधोपचार पद्धतीमध्ये 'टॅन री किंग' पद्धतीचा वापर करतात.
 
 
 
 
मिनिआपोलिसमधील मिनेसोटा विद्यापीठातील प्राध्यापक क्लीफोर्ड स्टीयर यांनी 'यूरोडेक्सिचोलिक अॅसिड'च्या वैद्यकीय फायद्यांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, 'यूरोडेक्सिचोलिक अॅसिड'मध्ये पेशींना जिवंत ठेवण्याची, दाह विरोधी गुणधर्म आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असल्याने ते कोरोनाची लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावी ठरु शकते. पिजंराबंद अधिवासातील अस्वलांच्या शरीरातून पित्त काढण्यास चीनमध्ये कायदेशीर मान्यता आहे. परंतु, नैसर्गिक अधिवासातील अस्वलांचे पित्त काढण्यावर बंदी आहे. त्यामुळे परदेशांमधून हे पित्त चीनमध्ये आयात केले जाते.
 
 
 
 
चीन आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये अस्वलांचे पित्त काढण्यासाठी त्यांना पिंजराबंद अधिवासात ठेवले जाते. अत्यंत क्रूर पद्धतीने अस्वलांच्या पित्ताशयामध्ये कॅथेटर, सिरिंज किंवा पाईप घालून पित्त काढण्यात येते. या पद्धतीमुळे अस्वलांना तीव्र वेदना आणि संसर्गाला सामोरे जावे लागते. परंतु, चीन मध्ये अशा अनेक पद्धतींचा वापर पारंपारिक औषध निर्मितींसाठी हजारो वर्षांपासून सुरु आहे. चीनी संस्कृतीचा आधारस्तंभ म्हणून पारंपारिक औषधांचा चीन सरकराकडून अनेकदा याचे सर्मथनही झाले आहे. त्यामुळे आता चीन सरकार पुन्हा अस्वलांच्या पित्ताची कोरोनाच्या उपचारावर शिफारस करुन वन्यजीवांच्या अवैध तस्करीला चालना देणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@