सीएए समर्थक विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या प्राध्यापकाचे निलंबन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020
Total Views |
Jamia Professor_1 &n
 

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील एका प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (सीएए) समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रा. अबरार अहमद, असे त्याचे नाव असून अशा १५ बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांना त्याने नापास केले.
 
 
 
प्रा. अबरारने ट्विट करत ही माहिती दिली होती. तो म्हणाला, "माझे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले शिवाय ते १५ बिगर मुस्लीम विद्यार्थी ज्यांनी सीएए कायद्याचे समर्थन केले होते." दरम्यान या प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनाने ही कारवाई केली आहे. प्रा. अबरार यांनी केलेला दावा गंभीर असून निंदनीय आहे. त्यांनी खरेच असे केले असेल तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तोपर्यंत त्यांचे निलंबन केले जात आहे.
 
 
 
 
 
ज्यावेळी सीएए विरोधात देशभर आंदोलन पेटले होते. त्यावेळी विद्यापीठातील वादही उफाळला होता. दरम्यानच्या काळात या प्राध्यापकाने १५ विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी दिली होती. शिवाय त्याच्या समर्थनात उर्वरित ५५ विद्यार्थी असल्याचेही म्हटले होते. जे सीएए कायद्याचे समर्थन करत आहेत. त्यांचा पट हजेरी क्रमांक आपल्याला माहिती असून परिक्षेत याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे तो म्हणाला होता. मात्र, यानंतर ही गम्मत असल्याचेही त्याने म्हटले होते. अबरार हा झाकीर नाईकचा अनुयायी असल्याचा दावा करतो. त्याने यापूर्वीही अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. हिंदूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचीही उदाहरणे आहेत.
 
 
कोरोना म्हणजे आपली परीक्षा
 
प्रा. बरार म्हणतो, "कोरोना म्हणजे एक प्रकारे अल्लाहची परीक्षा आहे. कोरोनाला न जुमानता आपण सीएए कायद्याचा विरोध करायला हवा," आश्चर्य म्हणजे विद्यापीठाने अद्यापही त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती. जो कोरोना म्हणजे अल्लाह का इम्तिहान असल्याचे सांगत फिरत आहे. एका प्राध्यापकाने अशा प्रकारचे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे, अशा प्रतिक्रीया आता उमटत आहेत.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@