पोलिसांचा नवा युक्तिवाद ! तुमच्या भावाला, पतीला बाहेर पडू देऊ नका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020
Total Views |

thane_1  H x W:
ठाणे : महाराष्ट्रासह भारतामध्ये लॉकडाऊन केल्यानंतर सर्वत्र संचारबंदी लागू करणायत आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानसह मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केल आहे. तरीही कलम १४४चा भंग करून अनेक नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. पोलिसांनी यावर युक्त्या काढत कोणी उठाबश्या काढायला लावल्या तर कुठे नागरिकांना चोप देण्यात आला. आता ठाणे पोलीसा आयुक्तांनी मात्र महिलांना साद घातली आहे. तुमच्या भावाला, पतीला घराबाहेर पडू देऊ नका. महिलांनो ही जबाबदारी तुमची आहे असं आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केले आहे.
 
 
 
महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांचा आकडा १२४ वर पोहचला आहे. त्या अनुशंघाने नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी, असे आवाहन फणसाळकर यांनी केले आहे.ठाण्यामध्ये त्यांच्या नावावर एक ऑडियो क्लिप वायाराल झाला होता. यावर तो ऑडियो क्लिपमधील आवाज माझा नाही असे सांगत त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असेदेखील सांगितले आहे. ठाण्यात १ नवा रुग्ण आढळला आहे. त्यादृष्टीने खबरदारी घ्या, घराबाहेर पडू नका आम्हाला आणि सरकारला सहकार्य करा असंही त्यांनी सांगितले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@