चिंताजनक ! जगभरात कोरोनाचे २० हजार बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020
Total Views |

corona_1  H x W
 
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरामध्ये एकूण २० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही कोरोनाचे हे वादळ अटोक्यात येताना दिसत नाही. संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या या कोरोनाची लागण एकूण १८१ देशांमध्ये ४ लाख २७ हजार ९४० नागरिकांना याची लागण झाली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने संकलित केलेल्या माहितीनुसार ही प्रसिद्ध केली. विविध देश तसेच जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीवरून हा आकडा समोर आला असून, प्रत्यक्षात हा आकडा आणखी मोठा असण्याची भीती व्यक्त होत आहे.
 
 
कोरोना संसर्गामुळे इटलीत मृत्यूंचे थैमान सुरू आहे. तर, दुसरीकडे स्पेन, अमेरिकेतही करोनाचा वाढता संसर्ग व मृतांच्या वाढत्या आकडेवारीने लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. ब्रिटनमध्ये ८२२७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून आतापर्यंत ४३३ जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३४३४ वर जाऊन पोहचली आहे. तर इटलीमध्ये ५ हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. इटलीमध्ये बुधवारी एकाच दिवसामध्ये ६८३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@