कोरोनामुळे जग चिंतेत मात्र चीनमध्ये परिस्थिती पूर्वपदावर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020
Total Views |
china_1  H x W:


हुबेई प्रांतातील कार उत्पादक कारखाने सुरु 


मुंबई : कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून चीनमधील हुबेई प्रांतात लॉकडाऊन होते. पण या भागातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. विशेष म्हणजे या प्रांतातील मोटार आणि त्यासाठी लागणाऱ्या छोट्या भागांच्या उत्पादनाचे कारखाने सुरू झाले आहेत. कामगार कारखानात येऊन काम करू लागले आहेत. कोरोनाचा प्रतिकार करीत असलेल्या संपूर्ण जगासाठी ही दिलासादायक बातमीच म्हणायला हवी.


हुबेई प्रांत हा चीनमधील कार उत्पादनासाठी प्रसिद्ध भाग आहे. अनेक कार उत्पादक कंपन्या याच भागात आहेत. पण कोरोना विषाणूचा फैलाव या भागात झाल्यानंतर या सर्व कारखान्यांना टाळे ठोकण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये सर्वांना घरीच कोंडण्यात आले होते. पण आता या भागातील संसर्ग कमी झाला आहे. हुबेईची राजधानी वुहानमध्येही परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे या भागात आता कामगार कामावर परतू लागले आहेत. कारखान्यातील सर्व काम पुन्हा सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.


हुबेईमध्ये कोरोना विषाणूचा सर्वाधिक फैलाव झाल्यानंतर कार उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. याचा अर्थातच चीनच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. एकीकडे कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी युरोप, अमेरिका आणि भारतानेही आपल्या येथील सर्व कारखाने तूर्त बंद केले आहेत. पण दुसरीकडे चीन या जागतिक महासाथीतून बाहेर पडला असून, तेथील हुबेई प्रांतात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@