विनाकारण मलेरियारोधक औषध घेऊ नका : केंद्र सरकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |

maleria medicin_1 &n



औषध विक्रेत्यानांही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे न देण्याचा आदेश



दिल्ली : कोरोना विषाणूचे संक्रमण थोपविण्यासाठी उपयुक्त ठरते म्हणून काही जणांनी मलेरियारोधक हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन हे औषध स्वतःहून घ्यायला सुरुवात केली आहे. अनेकांकडून औषधांच्या दुकानात या औषधाची मागणी केली जात आहे. पण अशा पद्धतीने अकारण मलेरियारोधक औषध कोणीही घेऊ नये, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. कोणत्याही औषध विक्रेत्यानेही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय असे औषध देऊ नये, असेही सरकारने स्पष्ट केले.


कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन हे औषध तूर्त सुचविले आहे. पण ते केवळ अशा रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसेविका यांच्यासाठी आहे. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांसाठी हे औषध सुचविण्यात आले आहे. सामान्यांनी हे औषध घ्यायची गरज नाही. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने या औषधाच्या निर्यातीवरही तूर्त बंदी घातली आहे. सरकारकडून हे औषध खरंच किती उपयुक्त आहे हे जाणून घेण्यासाठी समूहावर क्लिनिकल ट्रायल्सही घेतल्या जाणार आहेत.


इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे साथरोगनिवारण विभागाच्या प्रमुखांनी सांगितले की, हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन हे औषध आम्ही काहीजणांना प्रयोग म्हणून देणार आहोत. तूर्त कोणीही ते औषध दुकानातून घेऊ नये. या औषधाचे परिणाम काय आहेत, याचे आम्ही संशोधन करू. छोट्या समूहावर हा प्रयोग केला जाईल. जेणेकरून त्याचे निकाल आम्हाला लगेचच समजतील. हे औषध सगळ्यांसाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@