धक्कादायक ! एकाच दिवसात १० हजार लोकांना कोरोना ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |

america WHO_1  
 
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगभरामध्ये आणीबाणीचे वातावरण आहे. अशात चीनमध्ये परिस्थिती नियंत्रणात येते असताना आता पुढचे केंद्र अमेरिका असण्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकेमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डब्ल्युएचओच्या अहवालानुसार अमेरिकेमध्ये २४ तासांत १६,३५४ रुग्ण सापडले आहेत.
 
 
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे दुसरे केंद्र अमेरिका असण्याची भीती व्यक्त केली आहे. भारतामध्ये लॉकडाऊन केल्यानंतर डब्ल्युएचओने अमेरिकेला सूचक इशारा दिला आहे. अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुढच्या काही दिवसात युरोपपेक्षा अमेरिकेत जास्त रुग्ण आढळून येतील असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.
 
 
कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची जी नवीन आकडेवारी समोर आली आहे, त्यामध्ये ८५ टक्के प्रकरणे युरोप आणि अमेरिकेतील आहेत असे डब्लूएचओच्या प्रवक्त्या मारग्रेट हॅरिस यांनी पत्रकारांना सांगिलते आहे. सोमवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या डब्लूएचओच्या ताज्या आकडेवारीनुसार मागच्या २४ तासात युरोपमध्ये २०,१३१ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत हीच संख्या १६,३५४ आहे. त्यामुळे आता अमेरिका यावर काय पाऊले उचलतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@