महाभारत १८ दिवसांत जिंकले होते, कोरोनाची लढाई २१ दिवसांत जिंकू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |
Modi_1  H x W:




देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मोदींनी पहिल्यांदा आपल्या मतदार संघातील जनतेशी साधला संवाद 

वाराणसी : कोरोना व्हायरस आपली संस्कृती आणि संस्कार नष्ट करु शकत नाही. महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले होते पौराणिक दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधातील लढाई २१ दिवसांत जिंकायची आहे, असे म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोदींनी वाराणसीतील जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटातून निश्चित बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मोदींनी पहिल्यांदा आपल्या मतदार संघातील जनतेशी संवाद साधला. काशी आणि वाराणसीच्या जनतेने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत देशाची सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


नमो अॅपच्या माध्यमातून देशभरातील जनतेच्या सूचना येत असतात. देशातील युवा वर्गाने लॉकडाऊनला पाठिंबा देण्याची तयारी या माध्यमातून व्यक्त केली आहे. त्यामुळे लॉकडाऊन यशस्वी पार पडेल आणि कोरोनाविरोधातील लढाई आपण जिंकू, याची खात्री वाटते, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.


कोरोना विषाणूवरील उपाय आपल्यापरिने करण्याचा विचार करु नका. याची कोणतीही लक्षणं दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. सध्याच्या घडीला यावर कोणतीही लस नाही. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्यायला पाहिजे, असेही त्यांनी वाराणसीच्या जनतेला सांगितले. सरकार आणि प्रशासन तुमच्यासोबत असून त्यांच्यावर ताण पडेल अशी कोणतीही गोष्ट करु नका, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.


@@AUTHORINFO_V1@@