भारत लॉकडाऊन : आयआरसीटीसीकडून १४ एप्रिलपर्यंतच्या सर्व गाड्या रद्द!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |

IRCTC_1  H x W:



आयआरसीटीसीकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना


मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतात येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. या परिस्थितीत भारतीय रेल्वेकडून त्यांच्या बहुतांश सेवा पुढील २१ दिवसांसाठी रद्द केल्या आहेत. सर्व पॅसेंजर ट्रेन सुद्धा रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी नागरिकांना दिली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिक त्यांच्या प्रवासाच्या तिकिट रद्द करत आहेत. यासाठी आयआरसीटीसीकडून प्रवाशांना एक महत्वाची सुचना देण्यात आली आहे. आयआरसीटीसीकडून करण्यात आलेल्या सूचनेत असे म्हटले आहे की, रेल्वे गाड्या बंद केल्यानंतर प्रवासी त्यांनी बुकिंग केलेल्या ई-तिकिटांबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत.


आयआरसीटीसीने ट्विटरच्या माध्यमातून प्रवाशांना सांगितले की, प्रवाशांना तिकिट रद्द करण्याची आवश्यकता नाही आहे. रेल्वे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचा पूर्ण परतावा देण्यात येईल. परंतु जर प्रवाशांनी तिकिट रद्द केल्यास त्याचे कमी पैसे मिळू शकतात. यामुळे प्रवाशांनी ई-तिकिट रद्द करुन नका असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांच्या ई-तिकिटांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. रेल्वे गाड्या रद्द केल्यानंतर त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे कापले जात नाहीत. यापूर्वी रेल्वेने कोरोनाची परिस्थिती पाहता विंडोतिकिटिंग रद्द करण्यासाठी २१ जून पर्यत वेळ दिला आहे.





भारतीय रेल्वे सध्या पूर्णपणे भर मालगाड्यांवर देत आहे. नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरवला जावा, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. विविध राज्यात लॉकडाउनची परिस्थिती असल्याने भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांकडून स्टेशन, कंट्रोल ऑफिसमधून नागरिकांच्या सेवेसाठी काम केले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@