स्पेनमध्ये कोरोनचा कहर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |

spain corona_1  


एका दिवसात कोरोनाचे सुमारे अडीच हजार बळी

लंडन : जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे. जगभरात मृतांचा आकडा १९ हजारावर गेला आहे. जगभरातल्या मृतांची संख्या १९१०१ इतकी झाली आहे. २४ तासांत इटलीत ७४३ तर स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या दर तासाला वाढतच आहे. इटलीपाठोपाठ स्पेनमध्येही चीनपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आतापर्यंत स्पेनमध्ये कोरोनामुळे ३४३४ जणांचा बळी गेला आहे. तर अमेरिकेत गेले दोन दिवस प्रतिदिन १०० हून अधिक बळी गेले होते. पण मंगळवारी एकाच दिवशी अमेरिकेत २२५ बळी गेले.


जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तब्बल १९७ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. २४ तासांत त्यात ५० हजार नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे १ लाख ९ हजार रुग्ण बरे झाले आहेत.


इटलीमध्ये कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाही. इटलीत दररोज ६७२ च्या सरासरीने गेल्या पाच दिवसांत ३३६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १० दिवसांत ५३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनाचे संकट इटलीप्रमाणेच आणखी जोर धरू लागले आहे. स्पेनमध्ये मृतांची संख्या तीन हजारांच्या जवळ पोहचली असून एक-दोन दिवसांत स्पेन चीनलाही मागे टाकेल अशी शक्यता आहे. २४ तासांत स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा बळी गेला आणि मृतांची संख्या २९९१ वर पोहचली. स्पेनमध्ये गेला आठवडा भर प्रतिदिन मृतांची संख्या १०० पेक्षा जास्त असून अवघ्या ५ दिवसांत २१६० बळी गेले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@