श्रीकृष्ण अवतार समाप्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020
Total Views |

ShriKrishna_1  



 

बाण घुसल्यामुळे श्रीकृष्णाला तीव्र वेदना झाल्या. व्याध धावतच त्याच्याजवळ गेला. तिथे हरीण नसून एक दिव्य पुरुष पिवळ्या रंगाची रेशमी वस्त्रे परिधान करून झोपला आहे हे पाहून त्याला धक्काच बसला. श्रीकृष्ण कण्हत होते. त्यांनी व्याधाकडे पाहत स्मित केले व म्हणाले, “हे व्याधा, तू माझ्यावर तो बाण सोडून उपकारच केले आहेस. माझ्यासमोर मरावे कसे, हा प्रश्न होता. तो तू अनायसे सोडवला व मला उपकृत केले. तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्या घरी शांतपणे जा. या तुझ्या सुकृत्याबद्दल मी वर देतो की, तुला स्वर्गाची प्राप्ती होईल.” तरीपण व्याधाला पश्चाताप होऊन त्याने श्रीकृष्णाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

 

बलरामदादांनी अवतार संपवला आणि श्रीकृष्ण खूप एकाकी झाला. आता आपल्या आयुष्याची पण अखेर होणार, हे त्याला कळून चुकले. जे काही साध्य करायचे होते, ते त्याने केले होते. त्याचे मन जुन्या आठवणींमध्ये रमू लागले. यशोदामाई, गोकुळातले बालपण, राधा या रम्य आठवणी स्मृतिपटलावर आल्या. कंसाचा वध आणि मथुरेला तो पुन्हा स्मरू लागला. पांडवांशी झालेली प्रथम भेट पण त्याला आठवली. अठरा दिवसांचे महायुद्ध, पांडवांवर आलेली संकटे आणि त्यांना दिलेला आधार सारे सारे आठवले. गांधारीचा शाप खरा ठरून वृष्णी घराणेही नष्ट झाले होते. त्याने अभिमन्यूच्या पुत्राला जीवंत करून मोठेच काम पार पाडले होते. आता एकच आस मनी होती की, अवतार संपवण्यापूर्वी अर्जुनाला भेटणे आवश्यक होते.

 

त्याने समाधी लावून मनःशक्तीने अर्जुनाच्या मनात प्रवेश केला. श्रीकृष्ण अर्जुनाच्या स्वप्नात आला. त्याने त्याचे हात हाती घेतले व म्हणाला, “अर्जुना, तुला आठवतं की नाही? मी तुला म्हणालो होतो, या जगात प्रत्येक जण काही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जन्म घेतो व ते साध्य झाले की त्याला मरण स्वीकारावेे लागते.” अर्जुनाने होकार दिला. तो पुढे म्हणाला, “मग माझ्याही बाबतीत तीच गोष्ट खरी आहे. काही दिवसांतच माझे उद्दिष्ट पण साध्य होईल व मला या जगाचा निरोप घ्यावा लागेल. माझ्याबरोबर तुलाही यावे लागेल. कारण, आपण तर नरनारायण आहोत. आपण वेगळे राहू शकत नाही.” अर्जुन गोंधळून म्हणाला, “कृष्णा, तू हे काय बोलतो आहेस? मला तर काहीच कळेनासे झाले आहे!” कृष्ण म्हणाला, “बस! अर्जुना, तुला भेटायचे होते. माझी ती इच्छा पूर्ण झाली. आता मी जे बोलतो त्याचा अर्थ तुला उद्या कळेल.”

 

खरंतर श्रीकृष्णसुद्धा बलरामाप्रमाणे समाधीस्थ होऊन देह सोडू शकला असता. परंतु, तो मानव देहात अवतरला होता म्हणून त्याने ठरवले की, मानवाप्रमाणे देह सोडायचा. असा विचार करत तो दुसर्‍या दिवशी वनात विहार करायला गेला. तो थकून एका ठिकाणी जमिनीवर पहुडला. त्याला गाढ झोप लागली. त्या वनात एक व्याध शिकारीच्या शोधात धनुष्यबाण घेऊन फिरत होता. त्याची नजर ज्या ठिकाणी श्रीकृष्ण झोपला होता, तिथे पडली. त्याला दुरून वाटले की, कोणीतरी सावज आहे. त्याला वाटले की, हे हरीणच आहे म्हणून त्याने नेम धरून बाण सोडला. तो बाण कृष्णाच्या तळव्यात घुसला. दुर्वास ऋषींनी श्रीकृष्णाला वर दिला होता की, त्याच्या तळपायाचा भाग सोडला तर शरीरावरील कोणत्याही भागावर वार झाला, तर ते शस्त्र त्याला लागणार नाही. योगायोग असा की, हा व्याध समुद्रकिनारी फिरत असताना त्याच्या पायाखाली काहीतरी अणकुचीदार आले व तो अडखळला! त्याला एक लोखंडाचा तुकडा पायाखाली आल्याचे कळले. त्याने हा लोखंडी तुकडा उचलून त्यापासून बाण तयार केला होता. ज्या मुसळाचा भुगा करून समुद्रात टाका, असे बलरामाने सांगितले होते, त्याचाच हा एक भाग होता! त्याच मुसळाच्या लोखंडापासून केलेल्या बाणाने श्रीकृष्ण जखमी झाला. त्याच्या कोमल पायांचे दर्शन त्या व्याधाला झाले व ते हरिणाचेच मुख आहे, असेच वाटले!

 

बाण घुसल्यामुळे श्रीकृष्णाला तीव्र वेदना झाल्या. व्याध धावतच त्याच्याजवळ गेला. तिथे हरीण नसून एक दिव्य पुरुष पिवळ्या रंगाची रेशमी वस्त्रे परिधान करून झोपला आहे हे पाहून त्याला धक्काच बसला. श्रीकृष्ण कण्हत होते. त्यांनी व्याधाकडे पाहत स्मित केले व म्हणाले, “हे व्याधा, तू माझ्यावर तो बाण सोडून उपकारच केले आहेस. माझ्यासमोर मरावे कसे, हा प्रश्न होता. तो तू अनायसे सोडवला व मला उपकृत केले. तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्या घरी शांतपणे जा. या तुझ्या सुकृत्याबद्दल मी वर देतो की, तुला स्वर्गाची प्राप्ती होईल.” तरीपण व्याधाला पश्चाताप होऊन त्याने श्रीकृष्णाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कृष्णाचा आत्मा पृथ्वीवरून तेजाने उजळ होत स्वर्गी पोहोचला. आता या पृथ्वीतलावर त्याचे निर्जीव शरीरच पहुडले होते!

 

इकडे दारुक हस्तिनापुरात पोहोचला व त्याने युधिष्ठिर, भीम, अर्जुन आदी पांडवांना वृष्णी घराण्याचा नाश कसा झाला, हे सविस्तर कथन केले. अर्जुनाला आठवले, स्वप्नात येऊन श्रीकृष्ण म्हणाला होता की, “उद्या तुला सार्‍याचे आकलन होईल.” सारे पांडव प्रभास तीर्थावरती पोहोचले. त्यांनी सारे मृतदेह पाहिले. सात्यकी, प्रद्युम्न, गद यांचे प्रिय देह त्यांना दिसले. थोडे दूरवर बलराम व श्रीकृष्ण यांचेही मृतदेह त्यांना पाहायला मिळाले. त्या सर्वांचे और्ध्वदेहिक संस्कार पांडवांनी केले. द्वारकेस ते उरकून तो वसुदेवांना भेटण्यास गेला तेव्हा अर्जुनाला वसुदेवांनी ध्यानसमाधी लावून प्राणत्याग केल्याचे पण कळले. श्रीकृष्णाच्या मागे उरलेल्या कुटुंबांचा, बायका, मुले व द्वारकेचे नागरिक यांचा सांभाळ करण्याची मोठी जबाबदारी अर्जुनावर आली होती. त्याने सर्वांना एकत्र आणून हस्तिनापूरचा मार्ग धरला.

 

अर्जुनाने द्वारकेतून प्रस्थान करताच समुद्राने आपली मर्यादा ओलांडली. समुद्र वेगाने द्वारकेत घुसला. इमारती मागून इमारती कोसळू लागल्या. द्वारकेचे नामोनिशाणही आता उरले नाही. द्वारका समुद्रात लुप्त झाली. मार्गात अनेक अडथळे अर्जुनाला आले. वाटेत दरोडेखोरांनी पाहिले की एकच माणूस अनेक बायका व मुले यांचा सांभाळ करत त्यांना घेऊन जात आहे. म्हणून त्यांनी अर्जुनावरती हल्ला केला. अर्जुनाने आपले धनुष्य गाण्डिवला दोर लावून लढायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! तो धनुष्यास दोरही लावू शकला नाही. त्याचे सारे कौशल्य नष्ट झाले होते. त्याला कोणताही मंत्र आठवेना. त्याच्या बाणांचा भाता पण रिकामा झाला. सारी संपत्ती व बायका मुले यांना घेऊन दरोडेखोर निघून गेले. कसाबसा उरलेल्या थोड्या लोकांना घेऊन अर्जुन हस्तिनापूरला पोहोचला आणि बेशुद्ध होऊन कोसळला.

- सुरेश कुळकर्णी

(क्रमश:)

@@AUTHORINFO_V1@@