अखेर शाहीन बाग आंदोलन हटवले ; पोलिसांची कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |

shaheen bagh_1  
 
 

शाहीनबागींची मग्रुरी कायम, पुन्हा आंदोलनास बसण्याची तयारी 

 
 
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करण्याच्या नावाखाली शंभर दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या दिल्लीच्या शाहीनबागेतील कथित आंदोलन अखेर पोलिसांनी मंगळवारी सकाळी मोडून काढले. करोना महासाथीचा धोका लक्षात घेता पोलीस आंदोलकांना घरी जाण्यास सांगत असतानाही शाहीनबागींनी गर्दी करीत पुन्हा आंदोलनास बसण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला.
 
करोना महासाथीचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश एकत्रितपणे प्रयत्न करीत असताना आणि दिल्लीसह देशभरात लॉकडाऊन असतानाही मग्रुर आंदोलक शाहीनबागेतच ठाण मांडून बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूमध्ये सहभाग न नोंदविणाऱ्या शाहीनबागींनी दिल्लीत लागू केलेल्या कमल १४४ चे पालन करण्याही नकार दिला होता. करोना महासाथीचा धोका लक्षात घेऊन आम्ही केवळ पाच आंदोलक येथे बसू मात्र आम्ही आंदोलन सुरू; ठेवून अशी उद्दाम भूमिकाही त्यांनी घेतली होती. त्यामुळे संपूर्ण दिल्लीसाठी शाहीनबागींचा मोठा धोका निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या मोठ्या हिंसाचाराची मुळेदेखील शाहीनबागेतच होती.
 
दिल्लीसह देशातील परिस्थिती पाहता आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आणि आंदोलन थांबविण्याची विनंती प्रशासनाकडून शाहीनबागींना करण्यात आली होती. मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मंगळवारी सकाळी साडेसात – आठ वाजेच्या सुमारास दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी शाहीनबागेतील आंदोलनस्थळ रिकामे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तंबू उखडण्यात आले, फलक आदी साहित्य हटविण्यात आले. त्याचप्रमाणे रंगविलेल्या भिंती साफ करण्यासोबतच संपूर्ण परिसर आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटाईज करण्यात आला. यावेळी महिला पोलिसांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. आंदोलकांना हुसकावून लावल्याने दिल्ली – नोएडा हा महत्वाचा मार्ग तब्बल १०० दिवसांनतर मोकळा झाला आहे.
 
मात्र, एवढे सर्व होऊनही कथित आंदोलकांनी मग्रुरी मात्र सोडली नाही. पोलिसांनी आंदोलनस्थळ साफ केल्यानंतर करोना महासाथीमुळे संपूर्ण जगासह भारतात निर्माण झालेली परिस्थिती, त्यामुळे घरातच बसण्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आंदोलनास बसण्याची तयारी शाहीनबागींनी केली होती. त्यासाठी परिसरातील गल्ली-बोळांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीही जमविण्यात आली होती. अखेर पोलीस आणि निमलष्करी दलाने शाहीनबाग परिसरात फ्लॅग मार्च करीत लोकांना घरी जाण्याचे आवाहन केले, त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली.
 
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी शाहीनबागेसह जामिया मिलिया इस्लामिया, सीलमपूर, हौज रानी, जाफराबाद, तुर्कमान गेट, मालवीय नगर आदी ठिकाणांनाही रिकामे केले आले आहे. त्याचप्रमाणे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आले आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@